श्रीनगर : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. गुंड गांधरबलमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. त्यात एक दहशतवादी ठार झाला आहे. अजूनही परिसरात शोधमोहिम सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा रक्षकांना गांधरबलमध्ये २ दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. कुल्लनच्या जंगलात लश्कर ए तैयबाचे आणखी ५ दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती देखील मिळाली होती. जवान जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांकडून फायरिंग सुरु झाली. इतर दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.


काश्मीरमध्ये गेल्या ४८ तासात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. याआधी सोमवारी सकाळी उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात एक दहशवतादी ठार करण्यात आला होता. जवान सध्या या परिसरात सर्च ऑपरेशन राबवत आहे.