गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाला १ वर्ष पूर्ण
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय जवानांनी दाखवलं होतं शौर्य
मुंबई : गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारत आणि चीनच्या (India vs China) सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. देशभरात या हिंसाचारात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या हिंसाचारात आपल्या सैनिकांच्या मृत्यूची सत्यता चीननेही कटाक्षाने स्वीकारली. त्यावेळी चीनने भारतीय सैन्यदलावर हल्ला केल्याचा आणि चिथावणी दिल्याचा असल्याचा आरोप करत अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले. पण या व्हिडिओद्वारे चीन स्वतःच्या जाळ्यात अडकला आहे. सॅटेलाइट इमेजरी आणि गुगल अर्थ यांच्या माध्यमातून व्हिडिओचे विश्लेषण केल्यानंतर, चीनवर लक्ष ठेवून असलेल्या तज्ज्ञांनी सांगितले होते की, भारत आणि चीनमधील लढाईची ही जागा एलएसीपासून 50 मीटर अंतरावर आहे. ज्यामध्ये चीनने जबरदस्तीने भारतीय हद्दीत प्रवेश केला हे स्पष्ट झाले.
चीनचे तज्ज्ञ आणि ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे संशोधक नॅथन रसर यांनी असा दावा केला आहे की, भौगोलिकदृष्ट्या या चकमकीची जागा भारतीय हद्दीत असल्याचे दिसले. डोंगराच्या कडेला पोचण्याआधी आणि नदी ओलांडण्यापूर्वी दक्षिणेकडे निघालेल्या भारतीय दलाचे फुटेज पाहू शकतात. अशा परिस्थितीत चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसून हल्ला केला होता, हा दावा खरा ठरल्याचे दिसून येत आहे.
गलवानमध्ये भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर
भारतीय सैन्याने गलवानमधील चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले होते. यामुळेच येथे चिनी सैन्याला भारी नुकसान सहन करावे लागले. भारतीय लष्कराच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे की या झडपमध्ये कमीतकमी 50 चीनी जखमी झाले आहेत. रशियाची राज्य वृत्तसंस्था टास यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते की, गलवानमध्ये 45 चीनी सैनिक मरण पावले आहेत. मात्र, तेव्हा चीनने या हल्ल्यात आपले सैनिक मारले गेले हे कबूल केलेच नव्हते.
चीनने गलवानमध्ये सैनिकांच्या मृत्यूचा खुलासा
वास्तविक, लडाखमध्ये तणाव सुरू झाल्यापासून चीन सर्वांगीण वेढला गेला आहे. भारताच्या तीव्र प्रतिक्रियेने चीनी सैनिकांचा धैर्य खचलं होतं. दरम्यान, पेनगोंग तलावापासून सैन्य मागे घेण्याबद्दल चीनला स्वतःच्या देशात टीका सहन करावी लागत होती. उर्वरित प्रयत्न रशियन वृत्तसंस्था टास यांनी पूर्ण केली. टासच्या वृत्तावर लोकांचा अधिक विश्वास आहे, कारण गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमधील पहिली वार्ता रशियाच्या आवाहनानंतरच झाली होती.