Bull : कधी पाहिलाय 10 कोटींचा रेडा?
कुठे आहे हा 10 कोटींचा रेडा आणि नेमका हा रेडा आहे कसा.
मुंबई : तुम्ही आजपर्यंत अनेक धष्टपुष्ट आणि मोठ्या किंमतीचे रेडे पाहिले असतील पण कधी 10 कोटी रुपयांचा रेडा पाहिलाय? कुठे आहे हा 10 कोटींचा रेडा आणि नेमका हा रेडा आहे कसा. आजवर तुम्ही महागड्या किंमतीचे धष्टपुष्ट रेडे पाहिले असतील. पण कधी 10 कोटींचा रेडा पाहिलाय? हरयाणाच्या नरेंद्र सिंह यांच्याकडे एक असा रेडा आहे ज्याची किंमत तब्बल 10 कोटी रुपये आहे. मेरठच्या अखिल भारतीय किसान मेळाव्यात या रेड्याला पाहण्यासाठी खास गर्दी होतेय. गोलू 2 असं या कोट्यधीश रेड्याचं नाव आहे. गोलूसारखे त्याचे आजोबा गोलूही धष्टपुष्ट होते आणि कोट्यवधी किंमतीचे होते. म्हणून या रेड्याचं नाव गोलू 2 ठेवण्यात आलंय. आता या रेड्याची किंमत इतकी का आहे? तेही बघुयात. (10 crore rupess golu 2 bull watch full report at merath)
10 कोटींचा गोलू- 2 आहे कसा?
हा रेडा शुद्ध मुर्रा प्रजातीचा आहे. दररोज 26 लिटर दूध पितो. गोलू 2 वय 4 वर्ष 6 महिन्यांचा असून वजन 1 हजार 500 किलो इतकं आहे. गोलू 2 दररोज 30 किलो सुका चारा खातो. 7 किलो गहू-चणे, 50 ग्रॅम मिनरल मिक्शर घेतो. गोलू - 2 च्या वीर्यापासूनही चांगली कमाई
होते.
गोलू 2 चे आजोबा गोलू आणि वडील गोलू 1 हेही धष्टपुष्ट होते. पण गोलू टू या दोघांपेक्षा जास्त ताकदवान आहे. गोलू 2 ची किंमत 10 कोटी असली तरी आपण याला विकणार नसल्याचं नरेंद्र सिंह यांनी सांगितलंय. गोलू टूच्या मदतीनं हरयाणातल्या रेड्यांच्या प्रजाती सुधारणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.