श्रीनगर: २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत शंभर दहशतवादी ठार मारले गेले आहेत. तर या चकमकींमध्ये ४३ सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.  या कालावधीत १६ नागरिकांचाही मृत्यू झाला. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या 342 घटना घडल्या होत्या. यामध्ये 213 दहशतवादी मारले गेले होते. तर एकूण ८० जवान आणि ४० नागरिकांचाही मृत्यू झाला होता.


2016 मध्ये काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या 322 घटना घडल्या. यामध्ये 82 जवान आणि 15 नागरिकांचा मृत्यू झाला. तर लष्कराने 150 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.