Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. श्राद्धाच्या जेवणातून तब्बल 1 हजार लोकांना विषबाधा झाली आहे. एकाचवेळी एवढ्य़ा मोठ्या संख्येने लोक रुग्णालयात दाखल झाल्यामुळे रुग्णालयात उभं रहायलाही जागा नाही. रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाला आहे. बऱ्याच रुग्णांना इतरत्र दुसऱ्या रुग्णालायात पाठवण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील झांसी येथे ही घटना घडली आहे. येथील माजी प्रधान यांच्या घरी श्राद्धाच्या भोडनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे जेवण केल्यानंतर जवळपास एक हजार लोकांची प्रकृती बिघडली. जेवण केल्यानंतर अनेकांना उलट्या तर काहींना जुलाब होऊ लागले. प्रकृती बिघडलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक रुग्णसंख्या इतकी वाढली की काही वेळातच परिसरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली. अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले. तर अनेकांना झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले आहे. 


3 हजार लोकांना करण्यात आले होते आमंत्रित


झांसीच्या पुंछ पोलीस ठाण्याच्या बडोदा गावात हे श्राद्ध भोजन आयोजीत करण्यात आले होते. माजी प्रधान लखन सिंह राजपूत यांच्या वडिलांचे निधन झाले होते. शुक्रवारी त्यांच्या तेरावा दिवस होता. या निमित्ताने श्राद्ध भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.  पंचक्रोशीतील सर्व गावांना याचे आमंत्रण देण्यात आले होते. आसपासच्या गावातील जवळपास  3 हजार ग्रामस्थ या श्राद्ध भोजनासाठी आले होते. 


विषबाधा नेमकी कशी झाली?


रात्री राजपूत यांच्याकडे श्राद्धाचे भोजन जेवल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली. आधी 100 हूनि अधिक लोकांना त्रास जाणवला. बघता बघता हा आकडा 1 हजार पर्यंत पोहचला. सुरुवातीला वातावरण बिघडल्यामुळे प्रकृती बिघडली असल्याचे लोकांना वाटले. मात्र, सर्व रुग्णांची लक्षणे पाहिले असता हा काही तरी वेगळा प्रकार असल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता अन्नातून विषबाधा झाल्याचे आले. ज्यांची ज्यांची प्रृती बिघडली त्यांनी  राजपूत यांच्याकडे श्राद्धाचे भोजन जेवल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीएम, एसपी ग्रामीण व इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत अन्न विभागाचे पथक देखील बडोदा गावात पोहोचले होते. या पथकाने  पुरी, मिठाई, तेल, दही यांसह अनेक पदार्थांचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठवले आहेत. तीन दिवसांनी अहवाल येईल. अहवाल आल्यानंतरच अन्नातून विषबाधा होण्याचे कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.