नवी दिल्ली : १७ राज्यांमध्ये १०२३ कोरोनाग्रस्त हे मरकजशी संबंधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे मरकजच्या कार्यक्रमामुळे निर्माण झालेली दाहकता लक्षात येऊ शकते. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ११ हजार १२ कोटींचा निधी राज्य सरकारांना वितरित करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. २४ तासांत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैयक्तिक स्वच्छतेची काटेकोर काळजी घ्या तसेच प्रमाणित मास्कचाच वापर करा असे आवाहन देखील केंद्रीय आरोग्य विभागाने केले आहे.  


तबलीगींमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ९६० तबलिगींना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.


आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होणं ही गंभीर बाब असून असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर दगडफेक आणि मारहाणीचे प्रकार समोर आले. या पार्श्वभुमीवर महत्वाचा निर्णय केंद्रातर्फे घेण्यात आला आहे. 



इंदौर कोरोना हॉटस्पॉट


गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत चाचला आहे. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत छोटी मुंबई म्हटल्या जाणाऱ्या इंदौर शहरात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात कोरोना वायरस बाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे. 


१४ कोरोना बाधित रुग्णांपैकी ३ महिला तर ११ पुरुष आहेत. या रुग्णांचे वय १९ ते ६० दरम्यानचे असल्याची माहिती शासकीय महात्मा गांधी स्मृति चिकित्सा महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याने दिली. गेल्या नऊ दिवसांमध्ये कोरोना वायरसमुळे इंदौरमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाला.