नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. देशात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 363वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत 1211 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या एका दिवसांत 31 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 339 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील 1036 लोक कोरोनातून पूर्ण बरे झाल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं.



ICMRकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 2 लाख 31 हजार कोरोना चाचणी करण्यात आल्या. एका दिवसांत 21 हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. 


166 लॅबमध्ये कोरोना तपासणी होणार आहे. तसंच, 33 लाख किट्सची आणखी मागणी करण्यात आली आहे. पुढील 6 आठवडे पुरतील एवढे किट्स उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.


त्याशिवाय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 5.29 कोटी लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशनचं धान्य मिळणार आहे. तर 97 लाख लोकांना मोफत उज्ज्वला गॅसची सोय करण्यात येणार आहे. तसंच 2.1 लाख लोकांना पीएफ काढण्याची मुभाही देण्यात आली आहे.