अमरावती : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपट्टणममधील कुच्छुळुरू जवळ गोदावरी नदीत एक बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 61 जण प्रवास करत होते. ही एक पर्यटक बोट होती. 10 ते 12 जण या दुर्घटनेतून बचावल्याचं वृत्त आहे. तर इतर प्रवाशांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जातोय. मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी सर्वतोपरी मदत दुर्घटनाग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. एनडीआरएफ आणि बचाव पथकं घटनास्थळी आहेत, बचाव कार्यात नौदलाच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जाते आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाच्या मदतीची घोषणा केली आहे.



गोदावरी नदी काही दिवसांपासून पूर्णपणे भरुन वाहत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पावसामुळे प्रभावित झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेत बचावकार्यावर लक्ष ठेवणाचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने सध्या पर्यटकांच्या बोटींना पाण्यात जाण्यापासून रोखलं आहे. सर्व बोटींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.