१२ वीच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेवर गोळी झाडून केली हत्या....
हरियाणाच्या यमुनानगर जिह्यातील एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेची गोळी मारून हत्या केली होती.
नवी दिल्ली : हरियाणाच्या यमुनानगर जिह्यातील एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेची गोळी मारून हत्या केली होती. न्यूज एजेंसी ANIच्या वृत्तानुसार, १२ वी च्या या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने मुख्या्ध्यापिकेना गोळी मारली.
नेमके काय आहे हे प्रकरण?
एसपी राजेश कालियाने सांगितले की, यमुनानगर जिल्ह्यातील विवेकानंद शाळेत हा विद्यार्थी शिकत होता. या विद्यार्थ्याचे नाव शिवांश आहे. याला मुख्याध्यापिकेनी शाळेतून काढून टाकले होते. शनिवारी पालकसभेला हा मुलगा वडिलांची बंदुक घेऊन आाला आणि मुख्याध्यापिकेवर गोळ्या झाडल्या.
गोळ्या लागल्यानंतर मुख्याध्यापिका जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मु्ख्याध्यापिकेवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. एक त्यांच्या चेहऱ्यावर तर खांद्यावर तर एक हाताला लागली. ही घटना शनिवारी सकाळी ११:३० वाजता झाली.
म्हणून केली हत्या
गोळी झाडल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. पण सुरक्षारक्षकाने त्याला पकडले. यमुनानगरच्या SP राजेश कालिया यांनी सांगितले की, "विद्यार्थ्याची चौकशी केल्यावर मुख्याध्यापिका मला सतत त्रास देत असल्याने तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले."
शाळेतील गुन्हेगारीची अनेक प्रकरणे
गेल्या काही दिवसांपासून शाळेतील गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गुडगावच्या रायन इंटरनॅशनल शाळेतील ११ वी च्या विद्यार्थ्याने परिक्षा रद्द होण्यासाठी सात वर्षाच्या प्रदुम्नची केलेली हत्या असो किंवा ७ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी शाळा लवकर सुटावी म्हणून पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीची केलेली हत्या असो. एकंदर बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ते अत्यंत चिंताजनक आहे.