उत्तर प्रदेशात एक्सप्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरले
रेल्वे अपघात होण्याचं काही थांबताना दिसत नसल्याचं पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे.
पाटणा : रेल्वे अपघात होण्याचं काही थांबताना दिसत नसल्याचं पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील चित्रकूटजवळ वास्को-द-गामा-पाटणा एक्स्प्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ८ प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकपूर-मुघलसराय स्थानकादरम्यान हा अपघात झाला आहे. पहाटे ४ वाजून १८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं कळतयं.
अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरु करण्यात आलं तसेच घटनास्थळी बचावकार्याचं पथक आणि डॉक्टर दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामागचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र, रेल्वे रूळ तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.