भारतीय सैन्याने ९६ तासांत १३ दहशतवाद्यांचा केला खात्मा
भारतीय सैन्यानं 96 तासात घुसखोरी करणा-या 13 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. पाकिस्तानातून काश्मीर खो-यात होत असलेली घुसखोरी भारतीय सैन्यानं उधळून लावलीये..
जम्मू : भारतीय सैन्यानं 96 तासात घुसखोरी करणा-या 13 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. पाकिस्तानातून काश्मीर खो-यात होत असलेली घुसखोरी भारतीय सैन्यानं उधळून लावलीये..
संरक्षण खात्याच्या माहितीनुसार हे दहशतवादी वेगवेगळे गट बनवून घुसखोरी करत होते. काश्मीरमधील माछील, नौगाम येथील नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. याबाबत संरक्षण खात्यानं अधिकृत माहिती दिलीये..
भारतीय सैन्याकडून नियंत्रण रेषेवर सर्च ऑपरेशन नेहमी राबवलं जात त्यादरम्यान ही कारवाई केलीये. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये पाकिस्ताकडून गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळतीये.