नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी म्हटले की, सरकार पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे आणि येत्या दोन वर्षांत 15 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधकाम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय चालू आर्थिक वर्षात दररोज 40 किमी महामार्ग बांधण्याचे लक्ष्य गाठेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, 'रस्ते क्षेत्रात सरकार शंभर टक्के थेट गुंतवणूक (एफडीआय) मंजूर करीत आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन (एनआयपी) सारखे प्रकल्प हे सन 2019 ते 2025 मधील प्रथम प्रकारचे आहेत आणि सरकार नागरिकांना जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा पुरविण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे.'


'वर्ष 2025 पर्यंत एनआयपी अंतर्गत 111 लाख कोटी रुपयांच्या 7,300 पेक्षा जास्त प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल,' असे गडकरी म्हणाले. एनआयपीचा हेतू प्रकल्प तत्परता सुधारणे आणि महामार्ग, रेल्वे, बंदरे, विमानतळ, गतिशीलता, ऊर्जा, कृषी आणि ग्रामीण उद्योग यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे आहे.


याआधी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत-अमेरिका भागीदारी व्हिजन समिटला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, द्विपक्षीय संबंधांच्या या नव्या फेरीत भारत आणि अमेरिकेचे राष्ट्रीय हितसंबंध वाढत आहेत आणि दोन्ही सरकारांमधील विश्वास वाढत आहे. लवकरच सर्व प्रलंबित व्यापाराशी संबंधित प्रश्न सोडविले जातील आणि प्रमुख व्यापार करारावर स्वाक्षरी केली जाईल. त्यांनी अमेरिकन कंपन्यांना भारताच्या पायाभूत सुविधा आणि एमएसएमई क्षेत्रात गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले.