जलवाहतुकीत नितिन गडकरींचा भीमपराक्रम, हे अशक्य असल्याचं अनेक तज्ञांनी म्हटलं, पण....
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक अशक्य गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक अशक्य गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. हे शक्यचं नाही, असं अनेक अभ्यासकांचं बोलून झालं होतं, यानंतरही गडकरींनी गंगेतून जलवाहतुकीचा गडसर करून दाखवला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर वाराणसीच्या हल्दीयापर्यंत, गंगा नदीत व्यावसायिक जलवाहतूक सुरू करण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. अनेक तज्ञांनी हे अशक्य असल्याचं सांगितलं होतं.
स्वातंत्र्यांनतर पहिल्यांदा पेप्सी कंपनीचे १६ कंटेनर गंगानदीतून, कोलकात्याहून वाराणसीला येत आहेत. एवढंच नाही वाराणसीत पोहोचल्यावर हे १६ कंटेनर पोहोचल्यावर मोदी देखील तेथे उपस्थित असणार आहेत.
एवढंच नाही, वाराणसीहून ही जहाजं इफ्कोने तयार केलेली खतं घेवून परत कोलकात्याला परतणार आहेत.
आमची सहकारी वेबसाईट zeebiz.com दिलेल्या वृत्तानुसार, नितिन गडकरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. गडकरी यांनी टवीटमध्ये लिहिलं आहे. 'या आठवड्यातील भारतासाठी ही सर्वात मोठी बातमी होवू शकते.
स्वातंत्र्यानंतर आंतरदेशीय जहाजावर एक कंटेनर येत आहे. पेप्सिको कंपनीचे गंगा नदीच्या मार्गे, जहाज एमव्ही आरएन टागौरमधून १६ कंटेनर वाराणसीला येत आहेत, हे मोठं यश आहे'.
गडकरी यांनी लिहिलं आहे, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे कंटेनर वाराणसीत स्वीकारणार आहेत. जे पहिल्यांदाच आंतरदेशीय जलमार्गाने भारतात होत आहे. ही जहाजं १२ नोव्हेंबर रोजी वाराणसीत पोहोचणार आहेत. गडकरींनी म्हटलंय के हे टर्मिनल कमीत कमी रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे.
२८ ऑक्टोबर रोजी हे जहाज वाराणसीच्या दिशेने निघालं...
हे जहाज २८ ऑक्टोबर रोजी वाराणसीच्या दिशेने निघालं. वाराणसीतील हल्दिया घाटात जलमार्गाचं अंतर १ हजार ३९० किलोमीटर आहे. गंगा नदीत वाराणसीपासून हल्दीयापर्यंत जल वाहतुकीच्या परीक्षण सुरूवातीदरम्यान वाराणसीहून २ जहाज हल्दीयाला रवाना केले गेले.
या आधी १२ ऑगस्ट २०१६ रोजी हल्दीया घाटातून, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडून खिडकिया घाटातून हिरवा झेंडा दाखवून, २ जहाजातून मारूती कार आणि बांधकाम निर्मिती साहित्य रवाना केलं गेलं होतं.