1992 Ajmer Sex Scandal: 1992 अजमेर सेक्स स्कँडल प्रकरमी नफीस चिश्ती, नसीम उर्फ ​​टार्जन यांसारख्या आणखी 6 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1992 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर पीडितांना पुढे आणणे आणि पुरावे जपण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. कारण समाजात लागलेला कलंक आणि बलात्काऱ्यांच्या भीतीने पीडित महिलांनी आपलं घर आणि शहरही सोडलं होतं. दुसरीकडे पुरावे म्हणून गोळा केलेल्या चादरी, कंडोम इत्यादी वस्तूंना दुर्गंधी येऊ लागली होती. पुरावे व साक्षीदारांच्या अभावापोटी आरोपी सुटू नयेत यासाटी पोलिसांनी केवळ पुरावे जपले नाहीत तर नातेवाईकांच्या मदतीने पीडितांचे फोन नंबर मिळवले त्यांना साक्ष देण्यास पटवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभियोग विभागाचे सहायक संचालक विजयसिंह राठोड 2020 पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या आधी जवळपास 12 सरकारी वकील बदलले होते. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणात 100 हून अधिक शाळकरी मुलींना गुन्हेगारांनी लक्ष्य केलं होतं. परंतु फिर्यादी आणि पोलिस केवळ 16 पीडितांना साक्ष देण्यासाठी तयार करू शकले. अखेर काहींनी साक्ष दिल्यानंतर प्रभावशाली आरोपींच्या भीतीपोटी यातील 13 पीडित महिलांनी न्यायालयात जबाबही बदलला. अशा परिस्थितीत पीडितांच्या जुन्या जबाबाच्या आधारे न्यायालयात कारवाई करण्यात आली.


फिर्यादीचे वकील वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, 1992 दरम्यान आरोपींच्या सांगण्यावरून जप्त केलेले पुरावे जतन करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. प्रत्यक्षात पोलिसांनी आरोपींच्या फार्म हाऊसमधून पुरावे म्हणून कंडोम, कॅमेरा, डायरी, बेडशीट, कॅसेट, कपडे आणि इतर गोष्टी जमा केल्या होत्या. चारवेळा खटला चालला असता चार वेळा न्यायालयात हे सर्व पुरावे सादर करण्यात आले होते. पण 32 वर्षांनंतर या चादरींना दुर्गंधी येऊ लागली होती.


100 हून अधिक मुलींवर बलात्कार


अजमेरच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने या सेक्स स्कँडल प्रकरणी आणखी 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात 100 हून अधिक मुलींवर बलात्कार करम्यात आला आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रंजन सिंग यांनी प्रत्येक आरोपीला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.


फिर्यादीचे वकील वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, नफीस चिश्ती, नसीम उर्फ ​​टार्जन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीर हुसैन यांना गुन्ह्यात सहभागासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. आजारी असलेल्या भाटी याला रुग्णवाहिकेतून दिल्लीहून अजमेर न्यायालयात आणण्यात आले.


1992 मध्ये समोर आलं होतं अजमेर सेक्स स्कँडल


अजमेर सेक्स स्कँडल 1992 मध्ये समोर आलं होतं. 11 ते 20 वर्षाच्या शाळकरी आणि कॉलेज तरुणींना टोळीने लक्ष्य केलं होतं. या टोळीतील सदस्यांनी मुलींशी मैत्री केली आणि आक्षेपार्ह स्थितीत त्यांचे फोटो काढले आणि नंतर बलात्कार केला. पीडित मुली अजमेरच्या एका प्रसिद्ध खासगी शाळेत शिकत होत्या. त्यांना एका फार्म हाऊसवर बोलवलं जात असे. जिथे त्यांच्यावर बलात्कार केला जायचा.