नवी दिल्ली : 1 मेपासून काही गोष्टींचे स्वरूप बदलणार आहे. याचा परिणाम थेट आपल्या खिशावर होणार आहे. त्यामुळे हे बदल जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दैनंदिन जीवनात याचा उपयोग होणार असल्याने 1 मे पासून होणाऱ्या बदलांविषयी जाणून घ्या..


एलपीजी किंमत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किंमतीचा निर्णय घेतात. अशा परिस्थितीत 1 मेपासून सिलिंडरच्या किंमती बदलू शकतात.



बॅंक बंद 


मेमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद असतील. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो.  काही राज्यांच्या बँका या दिवशी बंद राहतील. 


त्याचबरोबर 2 मे रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. आरबीआयच्या वेबसाइटनुसार बँक मे मध्ये एकूण 5 दिवस (Bank Holidays List May 2021) बंद राहील. 


आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्यांच्या यादीतील काही सुट्ट्या या स्थानिक राज्य पातळीवर ठरतील. सर्व राज्यात 5 दिवसांची सुट्टी होणार नाही. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकत्रित साजरे होत नाहीत.


विमा नियामकानेही आरोग्य संजीवनी पॉलिसीची (Aarogya Sanjeevani Policy) व्याप्ती वाढविली आहे. आता सर्व कंपन्यांना 50 हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या मॅनडोरी इन्शुरन्स पॉलिसीची (MANDATORY INSURANCE POLICY) उत्पादने द्यावी लागतील. 


गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या आरोग्य संजीवनी मानक धोरणाला जास्तीत जास्त कव्हरेज मर्यादा 5 लाख रुपये होती. जुलै महिन्यात आयआरडीएआयने ही मर्यादा वाढविण्यास ऐच्छिक सूट दिली. पण कोणत्याही कंपन्यांनी यात रस दाखविला नाही. आता त्यांना 1 मे पर्यंत असे धोरण सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.


अ‍ॅक्सिस बँक ग्राहकांसाठी काही सेवा महाग 


अ‍ॅक्सिस बँकेत पगार किंवा बचत खाते असल्यास आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. अ‍ॅक्सिस बँकेने 1 मेपासून आपल्या बर्‍याच सेवा महाग करण्याची घोषणा केली आहे. यात तुम्ही एटीएममधून पैसे काढल्यानंतरही चार्ज लागेल. तसेच मिनिमम बॅलेंज चार्ज देखील वाढविले आहेत.