पटना : बिहार विधानसभेची 17 वी निवडणूक पूर्ण झाल्यानंतर नितीशकुमार आज सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सायंकाळी साडेचार वाजता राजभवनातील राजेंद्र मंडप येथे शपथविधी पार पडणार आहे. नितीशकुमार यांच्यासह नवीन मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. आज आठ ते दहा मंत्री शपथ घेऊ शकतात. उपमुख्यमंत्रीपदी सुशील कुमार मोदी पुन्हा शपथ घेतील असे मानले जात होते. पण भाजपचे ज्येष्ठ नेते तारकिशोर प्रसाद हे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले. उपनेता म्हणून रेणू देवी यांचीही निवड झाली आहे. यावेळी भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री बनणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी, 15 नोव्हेंबरला नितीशकुमार यांची एनडीएच्या बैठकीत विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेले. यानंतर त्यांनी राज्यपाल फागु चौहान यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांच्या सरकार स्थापनेच्या निमंत्रणानंतर आज, 16 नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.



आज बिहारच्या राजकारणाचा एक महत्वाचा दिवस आहे. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान, महाआघाडीने सरकार स्थापनेची आशा सोडली नाही. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार पुढे आले आहेत.



अति मागासलेल्या नोनिया समाजाच्या बेतिया येथून चौथ्यांदा निवडून आलेल्या भाजप नेत्या रेणू देवी यांचे नाव अंतिम झाले आहे. त्या बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनणार आहेत.


भाजपला नव्या रंगात रंगवायची तयारी आहे. यावेळी बर्‍याच नवीन चेह्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळत आहे. विधानसभेचे सभापतीपदही भाजपचेच असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यासाठी पाटणा साहिबचे आमदार आणि माजी रस्ते बांधकाम मंत्री नंद किशोर यादव आणि आरा येथून निवडून आलेले आमदार अमरेंद्र प्रताप सिंह यांची नावे चर्चेत आहेत.