कोरोना पसरवण्याचा आरोप करत महिला डॉक्टरांना मारहाण
उपस्थितांकडून फक्त बघ्याची भूमिका
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान मांडळ आहे. नागरिकांना घरात राहा सांगून आज आपले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने कोरोनाशी लढा देत आहेत. अस असतानाही देशभरात डॉक्टरांना मिळणारी वागणूक ही काही नीट नाही. दिल्लीतील सफदरजंग येथील दोन महिला डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कायदायक प्रकार घडला आहे.
दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील दोन महिला डॉक्टरांना त्यांच्या शेजारी असलेल्या कुटुंबाने धक्काबुक्की केली. या महिला डॉक्टर आपल्या गौतम नगर येथील राहत्या घरातून फळे आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. घराकडे जाताना ‘तुमच्यामुळे सोसायटीत कोरोनाचा संसर्ग होतोय’ अशी दमदाटी शेजा-यांनी सुरू केली. या संदर्भात महिला डॉक्टरांनी शेजा-या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आज आपण पाहतोय डॉक्टर कोरोनाशी दोन हात करत आहे. नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी सांभाळायला हवी. घरी राहून आपण कोरोनाशी लढायला हवं पण समाज म्हणून डॉक्टरांची कृतज्ञता व्यक्त करायला हवी. असं न करता डॉक्टरांनाच त्रास देण अत्यंत चुकीचं आहे.
पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपींनी तिथून पळ काढला. महत्वाचं म्हणजे उपस्थित असणाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका करत पोलिसांना माहिती देताना टाळाटाळ केली. पोलिसांना तपासात आरोपीची ओळख पटवली आहे. ४२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी इंटिरिअर डिझाइनर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.