मुंबई : नोकरी करता करता अनेकदा मनात विचार येतो की, काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायला हवा. परंतु असा विचार फक्त करून फायदा नाही. ते सत्यात आणण्यासाठी पावलं उचलनं गरजेचं आहे. कारण आम्ही तुम्हाला दोन अशा मित्रांची सक्सेस स्टोरी सांगणार आहोत. ज्यांनी शिक्षणासोबतच 1 वर्षापर्यंत नोकरी केली. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या मित्रांचे नाव दया आर्या आणि उपेंद्र यादव होय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी गुंतवणुकीतून सुरू केला व्यवसाय
दया आणि उपेंद्र या तरुणांनी आपल्या आवडीला पसंती दिली. दोघांनी डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात काम केले. आणि ऑनलाईन टी शर्ट विक्री सुरू केली. त्यांच्या व्यवसायाची विशेषतः होती की तो लोकांच्या डिमांडनुसार टी शर्ट प्रिंट करीत असत. आणि त्यांना विकत. दया आणि आर्याने हा व्यवसाय फक्त 10 ते 12 हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर सुरू केला. या व्यवसायाचे नाव त्यांनी Trim Trim store असे ठेवले.


काय आहे प्रिंट ऑन डिमांड बिझनेस मॉडेल?
बिझनेस मॉडेलच्या बाबत कंपनीचे को-फाऊंडर दया आणि आर्याचे म्हणणे आहे की, प्रिंट ऑन डिमांड थोडे खास मॉडेल आहे. जे कोणत्याही तरुणाला स्वतःच्या व्यवसायाची संधी देते. आम्ही आमच्या व्यवसायासोबतच त्या सर्व लोकांना मदत करतो. ज्यांना ऑनलाइन टी शर्ट सेलिंगचा व्यवसाय करायचा आहे. 
आमचे काम आहे की टीशर्ट मॉकअप तयार करणे आणि त्यांची प्रिंटिंग करणे. टी शर्ट तेव्हाच तयार होते, जेव्हा त्याची तशी मागणी असेल. या मॉडेलमध्ये आधीच प्रोडक्ट तयार करून ठेवायची गरज नाही. ही कंपनी trimtrim.in च्या नावाने होलसेलचा व्यवसाय करते.  त्यांचे प्रोडक्ट अनेक प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहेत. 


कंपनीची सुरूवात मार्च 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीला मोदी सरकारच्या स्टार्टअप योजनेअंतर्गत दोन बँकांकडून फंडिंग मिळाले आहे. कंपनीचा वर्षाचा टर्नओवर 1 कोटीहून अधिक असल्याची माहिती उपेंद्र यांनी दिली आहे.