मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मिळणार मंत्रीपद?
बिहारमध्ये भाजप सत्तेत सहभागी झाल्यावर इकडे दिल्लीत मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जेडीयू केंद्राच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेडीयूचे लोकसभेत २ तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळे राज्यसभेत बहुमत नसलेल्या मोदी सरकारसाठी जेडीयू महत्वाचा सहकारी ठरणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा एक मंत्रीपद अधिक मिळणार आहे.
नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप सत्तेत सहभागी झाल्यावर इकडे दिल्लीत मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जेडीयू केंद्राच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेडीयूचे लोकसभेत २ तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळे राज्यसभेत बहुमत नसलेल्या मोदी सरकारसाठी जेडीयू महत्वाचा सहकारी ठरणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा एक मंत्रीपद अधिक मिळणार आहे.
चारवर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यावर आज नितीश कुमारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केलं. रात्री उशिरा सत्तास्थापनेचा दावा करून बिहारमध्ये आज सकाळी एनडीएची सत्ता आली. आता उद्या नितीशकुमारांचं नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल. सरकारला १३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सुशील मोदींनी आधीच केलेला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक १२२चं संख्याबळ नितीशकुमारांच्या सरकारकडे आहे हे निश्चित आहे.