विरोधीपक्षातले एवढे आमदार येडियुरप्पांना मतदान करण्याची शक्यता
भाजपाच्या़ येडियुरप्पांना या २० लिंगायत आमदारांमुळे बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बंगळुरू : भाजपाच्या़ येडियुरप्पांना या २० लिंगायत आमदारांमुळे बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. बहुमत चाचणीच्या वेळी हे आमदार क्रॉस ओटिंग म्हणजे, येडियुरप्पांच्या बाजूने मतदान करू शकतात. टाईम्स ऑफ इंडिया नुसार, भाजपाच्या सुत्रांनी म्हटलं आहे की, या लिंगायत आमदारांचं राजकीय भविष्य पाहता असं करणं स्वाभाविक आहे. निवडणुकीआधी काँग्रेसने घोषणा केली होती, लिंगायत या वेगळ्या धर्माला मान्यता देण्यात येईल. हा मुद्दा निवडणुकीत काँग्रेसवरच उलटला आणि लिंगायत समाजाने, या निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात मतं टाकली.
विरोधीपक्षातील लिंगायतांना येडियुरप्पांचं भावनिक आवाहन
कर्नाटकाच्या एका भाजपाच्या नेत्याने म्हटलं आहे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बीएस येडियुरप्पाने भावनिक आवाजात बहुमतासाठी मत मागितलं होतं. या भावनिक आवाजात हे स्पष्ट होतं की, येडियुरप्पा विरोधीपक्षातील लिंगायत आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काँग्रेसमधील आणखी एक भीती
काँग्रेसमधील आणखी एक भीती व्यक्त करताना, उत्तर कर्नाटकाचे काँग्रेस एक नेते म्हणतात, येडियुरप्पाच्या पराभवानंतर केवळ लोकसभा निवडणुकीत लिंगायत मतं भाजपाच्या बाजूनेच जातील. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटलंय, काँग्रेस आणि जेडीएस यांचा एकमेकांवर विश्वास कमीच आहे, जरी पुढे त्यांनी सरकार बनवलं तरी, कर्नाटकात येत्या काळात मिड-टर्म विधानसभा निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही.