नवी दिल्ली : गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये ख्रिसमसचा लॉन्ग विकेंड तुमच्या अजूनही लक्षात असेल. असेच लॉन्ग विकेंड आपल्याला हवेहवेसे वाटतात. या वर्षात अशा भरपूर सुट्ट्या तुम्हाला एन्जॉय करता येणार आहेत. यासाठी २०१८ हे वर्ष नक्कीच खास असेल. मग आतापासूनच प्लॅनिंग सुरू करा.


जानेवारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० जानेवारीला शनिवार आहे. २१ जानेवारीला रविवार आणि २२ ला वसंतपंचमीची सुट्टी आहे. याच महिन्यात २६ जानेवारीला शुक्रवार आणि २७-२८ ला शनिवार-रविवार म्हणजे पुन्हा एकदा लॉन्ग वीकेंड आहे. याचा अर्थ या महिन्यात तुम्हाला दोनदा तीन सलग सुट्टया मिळतील.


फेब्रुवारी


१०-११ फेब्रुवारीला शनिवार-रविवार आहे. १२ सुट्टी घेऊन तुम्ही लॉन्ग वीकेंड एन्जॉय करू शकता. आणि परत १३ फेब्रुवारीला महाशिवरात्रीची सुट्टी आहे. अशा तुम्हाला ४ सुट्ट्या मिळतील.


मार्च


१ मार्चला होळी आहे. २ मार्चला शुक्रवार म्हणजेच धुलिवंदन आहे. ३-४ मार्चला शनिवार-रविवार आहे. याच महिन्यात २९ तारखेला महावीर जयंतीची सुट्टी आहे. ३० ला गुड फ्रायडे आणि ३१ व १ शनिवार-रविवार म्हणजे मस्त लॉन्ग वीकेंड. 


एप्रिल ते जून


एप्रिल २८-२९ ला शनिवार-रविवार आहे. ३० ला बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे. मे मध्ये कोणताही लॉन्ग विकेंड नाही. १५ जूनला ईदची सुट्टी आहे. १६-१७ ला शनिवार-रविवार आहे. जुलै पुन्हा कोणताही  लॉन्ग विकेंड नाही.


ऑगस्ट


१५ ऑगस्टला बुधवार आहे. जर तुम्ही गुरूवार-शुक्रवार सुट्टी टाकली तर १८-१९ ला शनिवार-रविवार अशी मोठी सुट्टी तुम्ही एन्जॉय करू शकता.


सप्टेंबर


१-२ सप्टेंबरला वीकेंड आहे. ३ ला जन्माष्टमीची सुट्टी मिळेल. तर १३ ला गणेश चतुर्थी आहे. १४ ला सुट्टी घ्या. १५-१६ ला वीकेंड आहे. 


ऑक्टोबर


१८ ऑक्टोबरला दसरा आहे. १९ ला सुट्टी घेऊन २०-२१ हा वीकेंड तुम्ही एन्जॉय करू शकता. 


नोव्हेंबर


या महिन्यात ३-४ वीकेंड आहेत. ५ ला धनतेरस आहे. ६ ला सुट्टी घेऊन ७-८-९ हे तीन दिवस दिवाळीचे आहेत. १०,११ ला वीकेंड आहे. अशाप्रकारे तुम्हाला ९ दिवसांची मोठी सुट्टी मिळेल. 


डिसेंबर


२२-२३ डिसेंबरला शनिवार-रविवार आहे. २४ ला सुट्टी घेऊन २५ ला ख्रिसमसची सुट्टी मिळेल. मस्त एन्जॉय करता येईल.