नवी दिल्ली : तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग, ही बातमी खास तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.


धक्कादायक माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र आणि राज्य सरकारने ने २०० हून अधिक वेबसाईट्सने काही आधार कार्ड लाभार्थीयांची माहिती सार्वजनिक केली आहे अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) UIDAIने दिली आहे.


RTIमध्ये झाला खुलासा


आधार कार्ड देणाऱ्या संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना ही माहिती दिली आहे. आता ही माहिती वेबसाईटवरुन हटविण्यात आल्याचं युआयडीएआयने म्हटलं आहे.


UIDAIने दिलं स्पष्टीकरण


नियमांचं उल्लंघन कधी झालं यासंदर्भात माहिती उपलब्ध झालेली नाहीये. आमच्याकडून आधार लाभार्थींची वैयक्तिक माहिती सार्वजनिक झालेली नाहीये असेही UIDAIने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केलयं.


शैक्षणिक संस्थांसोबतच केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विभागांतील जवळपास २१० वेबसाईट्सवरील लाभार्थींची वैयक्तीक माहिती सार्वजनिक करण्यात आली. यामध्ये लाभार्थ्याचं नाव, पत्ता आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश आहे.


आरटीआयच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, UIDAIने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं आणि संबंधित वेबसाईट्सवरुन आधार कार्डची माहिती हटविण्यात आली.


आधार सक्तीचं


केंद्र सरकारने सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. यामुळे UIDAIने आधारचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी आधुनिक तंत्र विकसित करीत आहे, असेही UIDAIने म्हटले आहे.