बंगळुरु : कर्नाटक सत्ता बदलाच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. यमकणमर्डीचे काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी २२ आमदारांसह भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज होते. सतीश जारकीहोळी हे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसमधील १८, जेडीएसचे २ आणि अपक्ष २ असे २२ आमदार भाजपमध्ये जाण्याची तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.


काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात भाजपला सर्वात जास्त जागा मिळूनही त्यांना बहुमत सिद्ध करण्यात यश आलं नव्हतं. त्यामुळे येडियुरप्पा यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते फक्त अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले होते. कर्नाटकमध्ये आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार आहे. पण हे सरकार बनवण्याआधी कर्नाटकमध्ये मोठं सत्तासंघर्ष पाहायला मिळाला होता. सगळ्यात कमी जागा असूनही जेडीएसला मुख्यमंत्रीपद मिळालं. पण कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसमध्ये सगळं काही अलबेल आहे असं दिसत नाही.


कुमारस्वामींची याआधीची वक्तव्य


याआधी कुमारस्वामी तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्री बनून मी विष पित आहे. त्यामुळे हे सरकार पडतं की काय अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाने वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली. तेव्हा देखील दोन्ही पक्षांमध्य़े असेलले मतभेद समोर आले होते. आता आमदारांमध्ये असलेली नाराजी समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार पडणार की आमदरांची मनधरणी करुन त्यांना शांत करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.