कोळसा घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांना २५ लाखांचा दंड
कोळसा घोटाळ्याप्रकरणी मधू कोडा यांना बुधवारी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं.
झारखंड : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयानं तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ लाखांचा दंड सुनावलाय..
यूपीए सरकारच्या काळात घोटाळा
कोळसा घोटाळ्याप्रकरणी मधू कोडा यांना बुधवारी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. त्यांच्यासह माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह आणखी चौघांनाही यात दोषी ठरवलं होतं.
यूपीए सरकारच्या काळात हा घोटाळा झाला होता.
अनियमित खाण वाटप
अनियमित पद्धतीनं खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्यानं कोडा यांच्यासह सर्व आरोपींवर कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलंय.
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे निराश झालो असलो तरी हाताश झालेलो नाही असं मत मधू कोडा यांनी व्यक्त केलंय..