मुंबई : देशात कोरोना  व्हायरसचा फैलाव वाढताना दिसत आहे. भारत आता कोरोनामुळे मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ९३ हजार ६०२ वर पोहोचली आहे. भारतीयांसाठी एक चिंतेची गोष्ट आहे. 
कोरोना संक्रमणाच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर, ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांत देशात २६ हजार ५०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या २१ हजार ६०४ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे चार ९५ हजार ५१३ जणांची कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप सुटका झाली आहे. 


शिवाय दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. दररोज २० हजांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. कोरोना रुग्णांची सख्या वाढत असली तरी या धोकादायक व्हायरसवर मात मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे.


देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू  राज्यामध्ये केरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांनुसार, जगभरात १ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५ लाख ३५ हजार लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.