नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला. यानंतर राज्यसभेत यावर चर्चा झाली, या चर्चेनंतर जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला राज्यसभेने मंजुरी दिली. आवाजी मतदानाने १२५ विरुद्ध ६१ अशा मताने कलम ३७० रद्द करण्यात आलं. कलम ३७० सोबतच कलम ३५ एदेखील रद्द करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता उद्या लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. लोकसभेमध्ये भाजपचं स्पष्ट बहुमत बघता हे विधेयक तिकडेही मंजूर होईल हे जवळपास निश्चित आहे.


जम्मू-काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ वर्षांपूर्वी केलेला निर्धार पूर्ण झाला आहे. १९९२ साली नरेंद्र मोदींनी काश्मीरच्या लाल चौकात नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकावला होता. त्यावेळी तत्कालीन भाजपा अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय एकता यात्रा काढण्यात आली होती.


काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपाचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागितली होती. पण या दडपशाहीला नरेंद्र मोदींनी आणि भाजपा नेत्यांनी भीक घातली नाही.