नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत धक्कादायक खुलासा होत आहे. रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यानंतरही सलग हे सत्र सुरुच आहे. एनसीबीच्या रडारवर बॉलीवूडच्या ३ मोठ्या स्टार्सची नाव आहेत. एनसीबीच्या रडारवर बॉलीवुडची ३ मोठी नाव आहेत. ही ३ नाव समोर आल्यानंतर एनसीबी त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करत आहे. पुरावे मिळाल्यासे एनसीबी या स्टार्सना देखील समन्स पाठवू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या एसआयटीला बॉलीवुडमधील ३ मोठ्या स्टार्सची नाव समजली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे बॉलीवुडचे सुपरस्टार आहेत. बॉलीवुडचे किंग असल्याचे म्हटलं जातंय. हे ड्रग्ज सेवन करत असून पुढच्या १५ दिवसात त्यांना समन पाठवलं जाऊ शकतं असं म्हटलं जातंय. 



साक्षीदाराकडून ५० नावं


ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज पॅडलर केजे ऊर्फ कमजीतने ५० नाव सांगितली आहेत. जप्त केलेले फोन रिकव्हर करुन एनसीबीला ती नाव मिळवायची आहेत. 


राकेश अस्थाना मुंबईत
एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना स्वत: मुंबईत असून आपल्या दिल्ली आणि मुंबई टीमसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. बॉलीवुड ड्रग्ज कनेक्शनसाठी ही बैठक महत्वाची मानली जातेय.


२० जण ताब्यात 


ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांची चौकशी झाली तर २० जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पण अजूनही तपास सुरुच आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एनसीबीने आतापर्यंत कोणाला क्लिनचीट दिली नाही. पुढेही तपास सुरुच राहील.