श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगर-जम्मू हायवेवर पोलीस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत एक भारतीय जवानही शहीद झालाय.


पोलीस महासंचालकांची माहिती


याबाबतची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी दिलीय. यात्रेवर हल्ला करणारे टॉपचे तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचं ट्वीट शेष पॉल वेद यांनी केलंय.


अबू मौविया, फुरकान हे लष्कर ए तोयबाचे अतिरेकी होते... तर यावर हा स्थानिक संघटना हबलिश काझीगंधचा दहशतवादी होता. 



अनंतनागमध्ये बसवर दहशतवादी हल्ला 


१० जुलै रोजी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता... तर १९ जण जखमी झाले होते. 'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. मृतांमध्ये पालघर जिल्ह्यातील दोघांचा समावेश होता तर इतर भाविक गुजरातमधील वलसाडचे रहिवासी होते.


जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.