३० बैठका मारून मिळवा मोफत प्लॅटफॉर्म तिकिट
`फिट इंडिया`चा अनोखा उपक्रम
नवी दिल्ली : 'फिट इंडिया' या अभिनयाची सगळीकडेच चर्चा आहे. असं असताना दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मोफत प्लॅटफॉर्म तिकिट मिळवण्यासाठी प्रवाशांना चक्क ३० बैठका माराव्या लागणार आहेत.
याकरता आनंद विहार रेल्वे स्टेशनवर बैठका मारण्याची मशीन लावण्यात आली आहे. या मशीनसमोर ३० बैठका मारल्यानंतर तुम्हाला मोफत प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार आहे. या संदर्भातील व्हिडिओ रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी 'फिटनेससोबत बचत देखील' अशी कॅप्शन लिहिली आहे.
या अभियानांतर्गत रेल्वे स्टेशनवर 'दवा दोस्त' असं दुकान देखील सुरू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये प्रवाशांना जेनेरिक औषध उपलब्ध होणार आहेत. भारतीयांना आपल्या आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी सोईस्कर मार्ग उपलब्ध करून देणं, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या दुकानात जेनेरिक औषध मिळणार आहेत. सध्या दिल्ली आणि राजस्थानमध्ये 10 दुकाने आहे. पुढील वर्षभरात या दुकानांची संख्या वाढवून 100 आणि पुढील चार वर्षात तीच 1000वर नेण्याचा मानस या योजनेचा आहे.