मुंबई: नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष मनमुरादपणे साजरा करता यावा याकरिता राज्य सरकारने हॉटेल, बार व परमिटरूम व इतर आस्थापने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.  तर, स्पीकरला रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स ३१ डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. परंतु, वेळेच्या या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क आण‌ि पोलिसांनी लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बनावट मद्याच्या पुरवठ्यावरही उत्पादन शुल्क व‌िभागाची नजर राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या खासगी पार्ट्यांनासुद्धा स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खूशखबर! नववर्षात होम लोनचा हफ्ता कमी होण्याची शक्यता


दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लागू करण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच केलेल्या कारवाईत वाकोल येथून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या पार्टीजवर करडी नजर ठेवली जात आहे. 


पुढच्या वर्षी सलग सुट्ट्यांची बोंब, नोकरदारांची कसोटी