पाटना : खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले तब्बल ३४ कौदी तुरूंगातून पळाले आहेत. ही घटना बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात रविवारी (२४ सप्टेंबरला) घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, पळालेल्या कैद्यांपैकी १२ कैदी सोमवारी (२५ सप्टेंबर) परत आले आहेत. त्यामुळे उर्वरीत कैद्यांचा पोलीस शोध घेत आहेत. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार तुरूंगात एकूण ८६ कैदी होते. त्यापैकी ३४ पळून गेले. पळून गेलेल्या कैद्यांपैकी काहींवर खून, तर काहीजन बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होते. तुरूंगाच्या भींतीला भगदाड पाडून आणि लोखंडी सळईच्या सहाय्याने दरवाजा तोडून या कैद्यांनी पोबारा केला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कैद्यांनी संधी साधली.


दरम्यान, तुरूंगातून कैदी पळण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्येही बिहारच्या जहानाबा कारागृहातून तब्बल १०० कैदी पळाले होते. या कैद्यांनी चादरींचा दोरीसारखा वापर करून कारागृहाची भींत ओलांडली होती.