मुंबई : एक चिंता करणारी बातमी आहे. देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. आता कोरोनाने डॉक्टरांनाही गाठले आहे. दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील (Sir Ganga Ram Hospital) 37 डॉक्टरांना कोरोना (COVID-19) झाल्याचे उघड झाले आहे. दिल्लीत सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने रात्रीची संचारबंदी लागू करत कडक नियम केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर  कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झालेय. कोविड-19च्या सध्याच्या लाटेमुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांना संसर्ग झाला आहे आणि त्यातील पाच जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत गुरुवारी सूत्रांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांमध्ये राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या बाबतीत तीव्र वाढ झाली आहे. पहिल्यांदाच 7,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.


कोरोना रुग्णांवर उपचार करताना हे डॉक्टर संक्रमित झाले आहेत. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की कोविड-19च्या साथीच्या नुकत्याच झालेल्या लाटेमध्ये 37 डॉक्टरांनी संसर्गाची पुष्टी केली आहे. सर गंगाराम रुग्णालयाच्या खासगी रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कोविड-19  रुग्णालयात उपचार करतांना  37 डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यापैकी बहुतेक डॉक्टरांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. एकूण 32 डॉक्टरांना सौम्य लक्षणे असून पाच डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम हॉस्पिटलने गेल्या एक वर्षापासून साथीच्या काळात कोविड-19च्या उपचारासाठी अग्रणी भूमिका बजावली आहे.


कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटना लक्षात घेता दिल्ली सरकारने कठोर पावले उचलली आहेत. दिल्लीत रात्रीची संचारबंदी  (Night curfew in Delhi) लावला आहे. त्याअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीवर सकाळी 10 ते सकाळी 5 या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. (Night Curfew is applicable in Delhi ) दिल्लीत आता कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.