पणजी : गोव्यातील काँग्रेसचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. काँग्रेस पक्षाचे कुंकळी मतदारसंघाचे आमदार क्लाफासियो डायस यांनी ही माहिती दिली आहे. विकासकामे आणि बेरोजगारांना नोकऱ्या देवू शकत नसल्यामुळे समर्थकांनी पाठिंबा दिल्यास आपण देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याचं डायस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आमदार डायस यांच्या विधानानंतर गोवा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेससह विरोधकांमध्ये ही निराशा पसरली आहे. तेलंगणामध्ये १२ काँग्रेस आमदारांनी टीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता गोव्यातही काँग्रेसला धक्का बसण्याची चिन्ह आहेत.


काँग्रेसची नीती ही लोकांच्या पंसतीस पडत नाही आहे. गोव्याच्या जनते समोर देखील काँग्रेसला आपलं मत मांडू शकली नाही. त्यामुळे पक्ष सोडल्या शिवाय पर्याय नसल्याचं काँग्रेस आमदारांचं म्हणणं आहे.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये वाद होत आहेत. राजस्थानमध्ये देखील ही गोष्ट पाहायला मिळाली.