श्रीनगर : Jammu Kashmir जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा Pulwama  जिल्ह्यात असणाऱ्या लस्सीपोरा भागात सोमवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या चकमकीत झालेल्या चकमकीत चार दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा दलांनी ठार केलेल्या या दहशतवाद्यांची ओळख अद्यापही पटलेलली नाही. त्यांच्यापाशी दोन एके रायफल, एक एसएलआर आणि एक पिस्तुल अशी शस्त्र सापडली आहेत. या परिसरात सध्याच्या घडीला प्रचंड तणावाचं वातावरण असून, शोधमोहिम सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. 



सोमवारी सकाळी झालेल्या या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याचं कळत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून, ते धोक्याबाहेर असल्याचंही स्षष्ट करण्यात आलं आहे. 



पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू- कास्मीर परिसरातील तणावाच्या वातावरणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे  दहशतवाद्यांशी दर दिवसाला सुरक्षा दलांसोबत होणारी चकमक आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून वारंवार केलं जाणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन पाहता भारताकडूनही या कारवायांचं चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.