दूषित पाण्यामूळे एकाच गावातले ६४ जण दगावले
आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
रायपुर : छत्तीसगढच्या नक्षल प्रभावित गरियाबंद जिल्ह्यातील सुपेबेडा गावात अस्वच्छ पाणी लोकांच्या मरणाचे कारण बनतं आहे. साधारण दीड हजाराची लोकसंख्या असलेलं गाव २००९ पासून किडनीच्या आजाराने त्रस्त असून आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. प्रत्येक घरात कोणीनाकोणी आजाराने त्रस्त आहे. सुपेबेडा गाव हे गरियाबंद जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागापासून १२ कि.मी अंतरावर आहे. इथे कित्येक गावकरी किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. गावात राहणारा ३० वर्षाचा तरूण कुमार सिन्हाच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. वर्षभरापासून मी काही काम करू शकलो नसून, जमीन विकून उपचार करत असल्याचे दोन मुलांचा बाप असलेला तरुण सांगतो. त्याच्याकडचे पैसेही आता संपलेयत. गावात स्वच्छ पाणी नसून कोणीही यासाठी काहीही करत नसल्याचे तरूणच्या बायकोची तक्रार आहे.
शेजारच्या गावातून पाणी
गावात राहणाऱ्या २८ वर्षाच्या प्रेमशीलाचा पती प्रीतम सिंह किडनीच्या आजाराने त्रस्त होते. २३ मे ला त्यांच्या मृत्यू झाला. तिचे वडिलही याच आजाराने २०११ साली निधन पावले. गावच्या बोअरवेलमध्ये फ्लोराइड आणि हेवी मेटलचे प्रमाण जास्त अससल्याने ती बंद ठेवल्याचे गावच्या सरपंच सुनीता नायक सांगतात. गावकऱ्यांना हे पाणी न पिण्यास सांगितलं गेलंय. सध्या शेजारच्या निष्ठीगुडा गावातील बोअरवेलचे पाणी वापरलं जातंय. पण हा कायमस्वरूपी उपाय नाही.