श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून सतत फायरिंग होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून सीमेवर सतत सुरु असलेल्या फायरिंगमुळे शनिवारी बीएसएफचे 3 जवान, एसएसबीचा 1 जवान आणि 3 नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय जवानांकडून देखील पाकिस्तानला चोख प्रत्त्यूत्तर दिलं जात आहे.


शुक्रवारी देखील पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता. ज्यामध्ये 35 लोकं जखमी झाले होते. 2 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सोबतच 2 भारतीय जवान देखील शहीद झाले आहेत.