इंदूर : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात उमरिया गावात एक चार वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


२४ तासांपासून बचावकार्य सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरिया गावात असलेल्या ४० फूट खोल बोअरवेलमध्ये रोशन नावाचा मुलगा पडला. रोशनला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांपासून बचावकार्य सुरु आहे.


सैन्य दलाचे अधिकारी घटनास्थळी


बोअरवेलमध्ये ३३ फूटांवर रोशन अडकल्याची माहिती समोर येत आहे. बचावकार्यासाठी एसडीईआरएफची टीम आणि सैन्य दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


दूध आणि ज्युसचा पूरवठा


रोशनला दोरीच्या सहाय्याने दूध आणि ज्युस पुरवलं जात आहे. रोशन बोअरवेलमध्ये अडकल्याच्या घटनेला एक दिवसाहून अधिक वेळ लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडला रोशन


प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेगाव परिसरात असलेल्या उमरिया गावात शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रोशनचे आई-वडील शेतात मजदूरी करत होते त्याच परिसरात रोशन खेळत होता आणि तो खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडला.


व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


रोशन बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली.


जिल्हाधिकारी आशिष सिंह यांच्या मते, रोशनला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी समांतर खड्डा खोदला जात आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफची टीम शर्थीने प्रयत्न करत आहे. दोराच्या सहाय्याने बोअरवेलमध्ये कॅमेराही सोडण्यात आला असून परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे.