नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधीच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील 40 कोटी लोकांमध्ये कोणत्याही अँटीबॉडीज नाहीत, याचाच अर्थ अजूनही 40 कोटी भारतीयांना कोरोनाचा धोका आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर केले. या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जून ते जुलै दरम्यान सर्वे करण्यात आला होता. या सर्वेत 28 हजार 975 लोकांनी सहभाग घेतला, यात 6 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांचाही समावेश करण्यात आला होता. यातून 67.6 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्याचं समोर आलं आहे. देशातील 6 ते 17 वर्ष वयोगटातील निम्म्यापेक्षा जास्त मुलांना कोरोना होऊन गेल्याचं या सर्वेत नमुद करण्यात आलं आहे. 


या सर्वेसाठी विविध वर्षांचे वयोगट तयार करण्यात आले होते. 
- 6 ते 9 वर्ष वयोगटात 57.2 टक्के


- 10 ते 17 वर्ष वयोगटात 61.6 टक्के 


- 18 ते 44 वर्ष वयोगटात 66.7 टक्के


- 45 ते 60 वर्ष वयोगटात 77.6 टक्के


- 60 वर्षांवरील वयोगटात 76.7 टक्के इतक्या लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या आहेत.


सर्वेमध्ये सहभागी 69.2 टक्के महिला आणि 65.8 टक्के पुरूषांमध्ये कोविड विरोधात अँटीबॉडीज आढळल्या आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना होण्याचं प्रमाण सारखच आहे. ग्रामीभ भागात 66.7 टक्के तर शहरी भागात 69.6 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळू आल्या. तर देशातल्या 85 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज सापडल्या आहेत.


दोन डोस घेतलेल्या 89.8 टक्के लोकांमध्ये आणि एक डोस घेतलेल्या 81 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या आहेत.