श्रीनगर : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लष्कराचे 40 जवान शहीद झाले. यानंतर देशभरात शोककळा पसरली आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा आत्मघातकी हल्ला घडवून आणला. आरडीएक्सने भरलेली एसयूव्ही कार मधून आलेल्या दहशतवादी आदिल अहमद दारने हा आत्मघातकी हल्ला केला. भारतीय लष्करी जवान प्रवास करत असलेल्या ठिकाणी कोणतीही नव्हती यामुळेच हा हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सुरक्षा नसण्याला मुफ्ती मोहम्मद सईद यांचा एक निर्णय जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2002 पर्यंत काश्मीरमधील भारतीय जवानांच्या ताफ्याला जम्मू काश्मीरमध्ये विशेष सुरक्षा दिली जात असले. याअंतर्गत भारतीय लष्कर कोणत्याही विभागातून जात असेल ते रस्ते रिकामी करण्यात येत होते. सुरक्षा रक्षकांचा ताफा जात असताना कोणते वाहन जात असेल तर ते थांबवण्यासाठी व्यवस्था तैनात असे. पण 2002-03 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी हा नियम हटवला. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. सुरक्षा रक्षक देखील सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्या ताफ्याला वेगळी सुरक्षा देण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे होते. 


तात्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर नियमात बदल झाला. विना सुरक्षा लष्करी जवान काश्मीरच्या रस्त्यांवरुन प्रवास करु लागले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये हीच त्रुटी दहशतवाद्यांनी ओळखली. 100 किलोग्रॅम स्फोटकांनी भरलेली कार लष्करी जवानांच्या बसवर आदळवली गेली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पाहणीसाठी गेलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या समोर सीआरपीएफच्या एका जवानाने हा नियम पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. 



2014 मध्ये सरकारने बदललेला आणखी एक नियम लष्करासाठी घातक ठरल्याचे भाजपा खासदार सुब्रहण्यम स्वामी यांनी सांगितले.  चेक पॉईंटवर कोणते वाहन रोखणे तसेच त्यावर बळ प्रयोग करण्याचा लष्कराचा अधिकार काढून घेण्यात आला होता. या कारणामुळे विस्फोटकांने भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसजवळ जाऊ शकली आणि देशाचे न भरून येणारे नुकसान झाले. 
लष्कराने एका मारुती कारवर फायरिंग केली होती त्यानंतर त्यांच्याविरुद्ध केस सुरू झाली. आजही ते जवान तुरूंगात आहेत. यानंतर हा आदेश आणण्यात आला होता. 2 नोव्हेंबर 2014 ला बडगाममध्ये ही घटना घडली होती. दोन चेक पॉईंट्स तोडून ही कार पुढे जात होती. यामध्ये दहशतवादी असू शकतात अशी शंका जवानांना आली आणि कारवर फायरींग करण्यात आली. ज्यामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला. शोधानंतर असे कळाले की, मोहरमची यात्रा करुन हे दोन तरुण परतत होते. याप्रकरणी चार जवान दोषी आढळले आणि ते शिक्षा भोगत आहेत. या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठा वादंग उफाळला. यानंतर सरकारने चेक पॉईंटवर बळाचा प्रयोग करण्याच्या नियमावर बंदी घातली होती.