श्रीरामपूर : २३ मे या दिवशी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपमध्ये येणार आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. 'ममता बॅनर्जींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी पश्चिम बंगालची जनता ऐतिहासिक मतदान करते आहे.' असं म्हणत नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमध्ये अजून मतदानाचे टप्पे बाकी आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालमधल्या श्रीरामपूरमध्ये प्रचारसभा झाली. त्यामध्ये मोदींनी ममता बॅनर्जींवर टीका केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ममता बॅनर्जी या केंद्र सरकारच्या योजनेवर स्वत:चे स्टीकर लावतात. केंद्र सरकारने मुलींच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. पण येथील सरकार राज्यात ती व्यवस्थित लागू करत नाही.' असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला फक्त २ जागा मिळाल्या होत्या.