Bengal Hawala Racket:  मंगळवारपासून म्हणजेच 23 मे पासून देशातील सर्व बँकांमध्ये दोन हजारांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. यामुळे अनेक जण पेट्रोल पंप तसेच इतर ठिकाणी नोटा खपवण्याचा प्रयत्न करत असताना हवाला रॅकेट मार्फत देखील या नोटांचा फेरफार केली जात आहे.   4500 करोड परदेशात पाठवण्यात आल्याचचे समजते. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात मोठं हवाला रॅकेट उघड झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता येथे हे हवाला रॅकेट उघडकीस आले आहे . कोलकाता मार्गे 4500 कोटी रुपये परदेशात पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  लालबाजार गुप्तचर विभागाने ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी मनजीत कौर नावाच्या तरुणी विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. लालबाजार गुप्तचर विभागाने आणखी सहा जणांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली आहे. कोलकाता पोलिसांच्या तपासात राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामधूनही मोठ्या प्रमाणात दोन हजाराच्या नोटा हवाला रॅकेटमध्ये गुंतवल्याची माहिती देखील समोर आली आहे. 


सिंगापूर, हाँगकाँग आणि चीनमधील कंपन्यांच्या खात्यात पैसे गुंतवले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल कोलकाता येथील एका सरकारी बँकेच्या 11 खात्यांमधून 4500 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगची तक्रार प्राप्त झाली होती. सिंगापूर, हाँगकाँग आणि चीनमधील काही कंपन्यांच्या खात्यात एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. त्या विदेशी कंपन्यांची अधिक तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी लालबाजार परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहित आहे.


कोण आहे मनजीत कौर?


या हवाला रॅकेट प्रकरणात उज्जैनमधील मनमीत कौर नावाच्या महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोलकाता येथील अलीपूर येथे ती राहत होती. आणखी दोघेजण तिच्यासोबत राहत होते. मनमीत कौरचा एक मित्र परदेशात मनी लाँड्रिंग करायचा. या महिलेच्या चौकशी दरम्यान मनजीत कौरचे नाव पुढे आले आहे. गुजरात आणि राजस्थानमधील अनेक व्यापारी यांच्या माध्यमातून आपला काळा पैसा हवाला रॅकेटमध्ये गुंतवत होते.


मुंबईतील तरुण या रॅकेटचा सुत्रधार


मुंबईत राहणारा प्रलय नावाचा तरुण या रॅकेटचा सुत्रधार  असल्याचे समजते.  मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांतील अनेक बँकांमध्ये त्याने अकाऊंट्स उघडले होते. गुजरात आणि राजस्थानमधील हजारो व्यावसायिक हवालाद्वारे कोट्यवधी रुपये महाराष्ट्रात आणतात.एक हजाराहून अधिक बँक खात्यांमार्फत  शेकडो खात्यांमध्ये व्यवसाय केला जातो. तेथून कोलकाता येथील 11 संस्थांच्या खात्यांवर हे पैसे पाठवण्यात आले.


4500 करोड परदेशात कसे पाठवले?


परदेशातून वस्तु आयात करण्याच्या बहाण्याने ही सर्व देवाण घेवाण चालायची. प्रत्येक आयातीसाठी बनावट कागदपत्रे तयार केली जायची. आयातीच्या खोट्या कागदपत्रांच्या बदल्यात ते साडेचार हजार कोटी रुपये परदेशी कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. ज्या कंपन्यामार्फत वस्तू आयात करुन पैसे पाठवले जायचे त्या कंपन्याही बनावट असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या रॅकेटचा मास्टरमाइंड प्रलय, त्याचा भाऊ संदीप दास, मनमीत कौर आणि दुसरा साथीदार रजनीश बायन हे पैसे परदेशात पाठवण्याच्या मोबदल्यात व्यापाऱ्यांकडून कमीशन घ्यायचे.