1,2 नव्हे तर सलग 5 दिवस बँका राहणार बंद
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ 5 दिवस बँका बंद असणार आहेत.
मुंबई : मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ 5 दिवस बँका बंद असणार आहेत. 29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत बँकांमध्ये कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे बँकांमधली तुमची कामं लवकर उरकून घ्या. २९ मार्चपासून चेक क्लिअरन्स आणि ड्राफ्टही बनणार नाहीत.
5 दिवस बँका बंद
29 मार्चला महावीर जयंती आहे. 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला बँकांची क्लोजिंग डेट तसंच 1 एप्रिलला रविवार आहे तर 2 एप्रिलला अॅन्यूअल क्लोसिंग असल्याने सलग 5 दिवस बँका बंद असणार आहेत. सलग 5 दिवस सुट्ट्यांमुळे अनेक कामं रखडणार आहेत.
अनेक कामं रखडणार
5 दिवस बँका बंद असल्यामुळे जीएसटी, वीम्याचे हफ्ते आणि आयकर जमा करण्याची शेवटची तारीख 27 मार्च करण्यात आली आहे. या 5 दिवसांमध्ये सरकारी कार्यालयही बंद असल्यामुळे या कार्यालयांना आर्थिक वर्षाचे शेवटचे व्यवहार 28 मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहेत.