मुंबई : कोरोना संकटात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओने काही मोठी पावले उचलली आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओने अलिकडच्या काळात ईपीएफच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ खात्यामधून पैसे काढण्यासह अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच ईपीएफओने नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड Advance दुसऱ्यांदा ईपीएफ खात्यातून काढून घेण्याची सुविधा दिली आहे. ही रक्कम तुम्हाला परत करण्याची गरज नाही. जर एखाद्या ईपीएफ खातेदाराला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल, तर तो त्याच्या पीएफमधून पैसे काढू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही कर्मचाऱ्यांना हे नियम आणि योजनांची माहिती नसते. ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. म्हणून ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी आता कोणते नवीन नियम आणले आहेत. याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


सेकेंड कोव्हिड Advance


EPFOने जाहीर केले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या कर्मचाऱ्यांनी अॅडव्हान्स ईपीएफ घेतला आहे, असे कर्मचारी दुसऱ्यांदाही अॅडव्हान्स ईपीएफ घेऊ शकतात. ईपीएफ सब्सक्राइबर्स  तीन महिन्यांपर्यंत  मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याची जमा होणाऱ्या रकमेपैकी 75% पर्यंत पैसे काढू शकतात.


नॉन-रिफंडेबल  Advance


एखादा ईपीएफओ सदस्य, जो एक महिन्यापेक्षा अधिक काळासाठी नोकरी करत नाही, तो त्याच्या पीएफ शिल्लकपैकी 75 टक्के रक्कम काढू शकतो. ईपीएफओ सदस्यांना ईपीएफओ पेन्शन नियमांनुसार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळवण्यासाठी पीफ खाते बंद न करता ईपीएफ खातेदारांना ही सुविधा देण्यात आली आहे.


EDLI योजनेअंतर्गत 7 लाखांचा विमा


ईपीएफओने ईडीएलआय योजनेअंतर्गत (EDLI scheme) जास्तीत जास्त विमा लाभ 6 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत वाढवला आहे. आता जर ईपीएफ खातेधारकाचा सेवेत असताना मृत्यू झाला तर, त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला 7 लाख रुपये मिळतील.


EPFआधार सीडिंग


ईपीएफओने ईपीएफ आणि पीएफ खातेधारकांना त्यांच्या संबंधित ईपीएफ खात्यास आधार कार्डाशी जोडणे बंधनकारक केले आहे. त्यांनी त्यांचा आधार ईपीएफ खात्याला जोडले नाही तर, नियोक्ते अशा ईपीएफ खात्यात पैसे देऊ शकणार नाहीत. कारण ईपीएफओ नियोक्त्याला अशा ईपीएफ खात्यांसाठी ईसीआर (इलेक्ट्रॉनिक चालान-कम-रिटर्न) वापरता येणार नाही.


नोकरी गमावल्यानंतरही कोव्हिड Advance


एखादा ईपीएफओ ग्राहक नोकरी गमावल्यानंतरही कोव्हिड Advance त्याच्या ईपीएफ खात्यातून घेऊ शकतो. परंतु त्यापूर्वी त्याने संपूर्ण रक्कम काढून खाते बंद केलेले नसावे.