सुरत येथे विषारी वायु गळतीमुळे 5 जणांचा मृत्यू, गुदमरल्याने 20 हून अधिक गंभीर
Gas leak in Surat : गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. वायु गळती होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : Gas leak in Surat : गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील सचिन परिसरात केमिकलने भरलेल्या टँकरमधून वायु गळती होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 20 हून अधिक मजूर गुदमरल्याने त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Gujarat: 5 killed, over 20 critical in gas leak in Surat)
विषारी वायूमुळे कामगार गुदमरले
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील सचिन परिसरातील जीआयडीसीची आहे. या परिसरात अनेक रासायनिक कारखाने आहेत. येथे टँकरमध्ये रसायनाची गळती झाली. त्यानंतर तेथे काम करणाऱ्या मजुरांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरला. हा वायू इतका विषारी होता की 5 जणांना जीव गमवावा लागला. तसेच अनेक मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एक टँकर चालक प्रिंटिंग मिलजवळील नाल्यात विषारी रसायन टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली. वायू हवेच्या संपर्कात आला. या विषारी वायूने प्रिंटिंग मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मोठा त्रास जाणवू लागला.
पोलीस घटनास्थळी दाखल
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.