नवी दिल्ली : आतापर्यंत ओळखपत्र आणि अड्रेस प्रुफ म्हणून पासपोर्ट कामी येत होता. मात्र आता असे होणार नाही. तुमचा पासपोर्ट अड्रेस प्रुफ म्हणून कामी येणार नाही. सरकार पासपोर्ट नियमांत बदल करत आहे. इंतकच नाही तर पासपोर्टचा रंग देखील बदलणार आहे. विदेश मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालयच्या वतीने बनवण्यात येणाऱ्या तीन सदस्यीय समितीच्या रिपोर्टनंतर हा निर्णय घेण्यात येईल. विदेश मंत्रालयच्या वतीने, समितीच्या रिपोर्टचा स्विकार करण्यात आला आहे. आता नवीन नियमांनुसार पासपोर्ट तयार केले जातील. यात काय-काय बदल असतील, या जाणून घेऊया...


अड्रेस प्रुफ म्हणून का कामी येणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पासपोर्टच्या नवीन व्हर्जनमध्ये शेवटचे पान खाली ठेवण्यात येईल. पूर्वी या पानावर अड्रेस सहित लीगल पॅरेंट्सचे नाव, आई, पत्नी, पतीचे नाव आणि जुन्या पासपोर्टचा नंबर इत्यादी माहिती होती. मात्र नवीन पासपोर्टमध्ये हे पान आता नसेल. त्यामुळे तु्म्ही पासपोर्टचा अड्रेस प्रुफ म्हणून वापर करू शकणार नाही.


असलेल्या पासपोर्टचे काय होणार?


विदेश मंत्रालयानुसार, आतापर्यंत तयार झालेले सर्व पासपोर्ट मान्य आहेत. जेव्हा या पासपोर्टची व्हॅलिडिटी संपेल तेव्हा नवीन पासपोर्ट तयार केला जाईल. याचा अर्थ व्हॅलिडिटी संपेपर्यंत तुम्हाला पासपोर्टमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही.


पोलीस व्हेरिफिकेशन होणार ऑनलाईन


गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये क्राईम अॅंड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क अॅँड सिस्टम प्रोजेक्ट (CCTNS)ला पासपोर्ट सेवा केंद्रासोबत लिंक केले आहे. त्यामुळे पूर्वी फिजिकल होणारे पोलीस व्हेरिफिकेशन रद्द करून ते ऑनलाईन करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट बनवण्यासाठी लागणार वेळ अजून कमी करण्यात येईल. 


काय-काय बदल होणार?


  • आता पासपोर्टवर आई-वडिलांचे नाव आणि अड्रेस असलेले पान नसेल. ते शेवटचे पान रिकामे ठेवण्यात येणार आहे.

  • ECR कॅटेगरीत असलेल्या लोकांना निळ्या ऐवजी नारंगी रंगाचा पासपोर्ट मिळेल.

  • नॉन ECR कॅटेगरीतील लोकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगाचा पासपोर्ट मिळेल. 

  • या व्यवस्थेत गव्हर्नमेंट ऑफिसर्संना सफेद रंग, डिप्लोमेंट्सला लाल रंग आणि अन्य लोकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट मिळेल.

  • नवीन पासपोर्ट नाशिक स्थित इंडियन सिक्युरिटी प्रेस डिझाईन करेल.