बारमेर : Bus and Tanker Accident : राजस्थानमधील बाडमेरमध्ये भीषण रस्ता अपघातानंतर मोठी आग लागली. अपघातानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. बारमेर जिल्ह्यातील पाचपदरा पोलीस स्टेशन हद्दीतील जोधपूर महामार्गावरील भंडियावासजवळ बुधवारी बस आणि ट्रेलरची धडक झाली. (Bus and Tanker Collision in Barmer) त्यानंतर बसला आग लागली आणि या अपघातात पाच जण जिवंत जाळाले. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (5 people burnt to death as bus catches fire after colliding with tanker in Rajasthan)


आगीत 12 लोक होरपळेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अपघात एवढा भीषण होता की या आगीत सुमारे 12 लोक होरपळेत. या जखमींना बालोत्रा ​​येथील नाहाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पाचपदरा पोलीस ठाण्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने आग आटोक्यात आणली असून बचावकार्य सातत्याने सुरू आहे.



महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी


घटनेची माहिती मिळताच विभागीय आयुक्त राजेश शर्मा, बाडमेर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सुखराम बिश्नोई आणि पाचपदराचे आमदार मदन प्रजापत घटनास्थळी पोहोचले.  बारमेरचे जिल्हाधिकारी लोक बंधू आणि पोलीस अधीक्षक दीपक भार्गव हेही जिल्हा मुख्यालयातून घटनास्थळी रवाना झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याठिकाणी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे.


बसमध्ये आणखी काही लोक अडकल्याची भीती 


बस आणि टँकरची टक्कर होताच बसला आग लागली आणि त्यामुळे बसमधील लोक त्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोक खिडकी तोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर बहुतांश लोक आत अडकले आहेत. बसमध्ये आतापर्यंत किती प्रवासी अडकले आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस बचावकार्य करत आहेत.