गुजरात निवडणूक : या `५` कारणांमुळे गुजरातमध्ये भाजपचा किल्ला अभेद्य!
पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली.
नवी दिल्ली : पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली. यावरूनच दिसून येते की, भाजपला पराभूत करणे कठीण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. यांच्याबद्दल गुजरातमधील जनतेचे मत सकारात्मक आहे.
जुन्या चुकांचा फायदा
कॉंग्रेसने दलित, हिंदूत्व दाखवले असले तरी देखील त्यांना गुजरातमध्ये सत्ता प्रस्थापित करणे शक्य झाले नाही. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जुन्या चुकांचा फायदा भाजपने उचलला.
सामान्यांना भिडणे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांचे तळागाळातील लोकांशी जवळीक आहे. त्यांचे हे सामान्यांना भिडणे भाजपच्या विजयाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
दणकून प्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्याभरापासून दणकून प्रचार करत आहेत. त्यांनी गुजरातमध्ये तब्बल ३० सभा घेतल्या. सभेदरम्यान प्रार्थनेचा आवाज आल्यानंतर ते भाषण करायचे थांबले व कोणत्याही धर्मामध्ये येऊ इच्छित नसल्याचे सांगितले. यामुळे ते लोकांनी भावनात्मकरित्या जोडले गेले. त्याचबरोबर त्यांनी मुस्लिमांचीही मने जिंकली.
पक्षाचे तगडे नेतृत्व
अमित शहा यांनी पक्षाचे तगडे नेतृत्व केले. ज्याप्रकारे त्यांनी ही कामगिरी बजावली त्यास कोणी टक्कर देऊ शकत नाही.
संघाची चांगली साथ
भाजपला संघाची चांगली साथ मिळाली. त्यामुळे तळागाळातील सामान्य जनतेशी भाजपा जोडली गेली. भाजपचे संघटन उत्तम झाले. असे बोलले जात आहे की, भाजपने ३० मतदारांनामागे एका कार्यकत्याची ड्युटी लागली होती. या संघटनात्मक प्रक्रीयेचा भाजपाच्या विजयात महत्त्वपूर्ण सहभाग आहे.