Central Government Scheme: केंद्र सरकारच्यावतीने (Central Government) देशात अनेक योजना राबवल्या जातात. देशातील गोर-गरीब जनतेला याचा फायदा व्हावा हा या मागचा उद्देश आहे. कोरोना (Corona) काळात केंद्र सरकारतर्फे लसीकरणाची (Vaccination) मोहिम वेगाने राबवण्यात आली होती. लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रमही राबवण्यात आले. पण सध्या एक मेसेज (Messege) व्हायरल (Viral) होत असून यात दावा करण्यात आला आहे की ज्यांनी कोविड लस (Covid Vaccination) घेतली आहे त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत. fgf
 
जन कल्याण विभागातर्फे पैशांचं वाटप
या मेसेजमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार पंतप्रधान जन कल्याण विभागातर्फे या पैशांचं वाटप करण्यात येत आहे. ज्या लोकांनी कोविड लसीचे डोस घेतले आहेत, त्या लोकांच्या खात्यात पंतप्रधान जन कल्याण विभागातर्फे 5 हजार रुपये जमा केले जात आहेत. पीआयबी (Press Information Bureau) यासंदर्भात माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. हा फेक मेसेज फॉरवर्ड करु नका असं आवाहनही पीआयबीने केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेजेसपासून लोकांनी सावध रहावं, मेसेजमधला दावा खरा मानून आपल्याला फेक कॉल येऊ शकतात आणि आपली वैयक्तिक माहिती तुम्ही देऊ शकता. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉडचा धोकाही होऊ शकतो असं पीआयाबीने म्हटलं आहे. 


जर तुमच्याकडे अशा प्रकारचे खोटे मेसेज येत असतील तर तुम्ही अशा मेसेजची सत्यता पडताळू शकतो. यासाठी केंद्र सरकारची अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर जाऊन तो मेसेज खरा आहे की खोटा आहे याबाबत माहिती घेऊ शकतो. तसंच व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर सत्यता पडताळू शकता.