देशात रोज जाताय ५५० लोकांच्या नोकऱ्या, १२ कोटी लोकं बेरोजगार
तरुणांसाठी आज नोकरी मिळवणं कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही आहे. यातच त्यांच्यासाठी एक बॅडन्यूज आली आहे.
नवी दिल्ली : तरुणांसाठी आज नोकरी मिळवणं कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही आहे. यातच त्यांच्यासाठी एक बॅडन्यूज आली आहे.
देशात प्रत्येक वर्षी हजारो मुलं शिक्षण घेऊन कॉलेजमधूनब बाहेर पडतात. पण हातात डिग्री असून पण नोकरी मिळत नाही. भारतात बेरोजगारांचं प्रमाण वाढत आहे.
भारतात ११ टक्के लोकं म्हणजे १२ कोटी लोकं बरोजगार आहेत.
२०१५-१६ मध्ये बेरोजगारांचा दर ५ वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे,
२०१५ मध्ये १ लाख ३५ हजार लोकांना नोकरी मिळाली.
सरकारी नोकरी असेल तर पगार ५० हजार ते १ लाखापर्यंत असेल.
४ वर्षात ५५० नोकऱ्या रोज गेल्या. ज्यामध्ये महिल्यांच्या बेरोजगारीचा दर ८.७ टक्क्यावर पोहोचला आहे.
श्रम रोजगाराच्या रिपोर्टनुसार, स्वंरोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत तर नोकऱ्या देखील कमी झाल्या आहेत.