नवी दिल्ली : देशात वेगाने पसरणार्‍या कोरोना संसर्गाबाबत सोशल मीडियावर (Social Media)वेगवेगळे दावे केले जात आहेत. 5 जी चाचणीमुळे कोरोना (5G Technology and COVID-19 Link)पसरत आहे असा दावा देखील केला जात आहे. कोरोनासारखा आजार हा 5 जी तंत्रज्ञानाची चाचणी केल्याचा परिणाम असल्याचा दावा केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 जी तंत्रज्ञानाचा कोरोना विषाणूच्या प्रसाराशी कोणताही संबंध (5G Technology and COVID-19 Link) नाही असे दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) स्पष्ट केले आहे. यांचा संबंध असल्याचा केला जाणारा दावा खोटा आहे. त्याला वैज्ञानिक आधार नाही असेही सांगण्यात आले. तसेच 5 जी नेटवर्कची चाचणी भारतात कोठेही सुरू झालेली नसल्याचे स्पष्टीकरण दूरसंचार विभागाने (DoT) दिले आहे.



मोबाईल टॉवर्समध्ये नॉन-आयनीकरण रेडिओ फ्रिक्वेन्सी असतात. जी अत्यंत कमी उर्जेची असते. यामुळे पेशींचे कोणतेही नुकसान होत नाही. रेडिओ फ्रिक्वेन्सी क्षेत्रासाठी एक्सपोजर मर्यादा निकष निर्धारीत केलेले आहेत. जे आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा दहा पट जास्त असल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले.



दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच भारतात टेलिकॉम कंपन्यांच्या 5 जी चाचणीचा (5G trial in India) अर्ज मंजूर केला. कोणतीही कंपनी त्यात चिनी तंत्रज्ञान (Chinese Technology) वापरत नाही. दूरसंचार विभागाने यासाठी रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel), व्होडाफोन आणि एमटीएनएलच्या अर्जांना मंजुरी दिली आहे. यापैकी कोणतीही कंपनी चिनी कंपन्यांचे तंत्रज्ञान वापरत नाही.